ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर तेज न्यूज
त्रंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील रुग्ण अपघातात गंभीर जखमी झाल्याने नाशिक जिल्हयातील नावाजलेल्या रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार सुरु असतानांच डॉक्टरानीं रुग्णास मृत घोषित केले.त्यानंतर कथित मृत युवकावर गावी अंत्यविधीची तयारी सुरु असतानांच रुग्णाची हालचाल पाहुन रुग्ण जिवंत असल्याची खात्री झाली.सदरील रुग्णास पुन्हा नव्याने उपचारासाठी दाखल केले गेले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि त्रंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील भाऊ लचके नावाच्या युवकाचा नुकताच गावाजवळच अपघात झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास नाशिक मधील मराठा विदया प्रसारक संचलीत डॉ वसंत पवार मेडिकल महाविदयालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. सबंधीत रुग्णालयातील डॉक्टरानीं उपचारानंतर सदर रुग्णास मृत घोषीत केले.त्यानंतर सदर कथित मृत तरुणास अंबोली येथे आणुन अंत्यविधीची तयारी सुरु झाली होती.
दरम्यान अंत्यविधीपुर्वीच कथित मृत तरुणाची हालचाल सुरु असल्याचे लक्षात आल्यावर सदर तरुण जिवंत असल्याचे निष्पन्न होऊन त्यांस तातडीने नाशिक येथील सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
म.वि.प्र.च्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह
घडलेली घटना ही महाराष्ट्रातील दुसर्या क्रंमाकाची संस्था असलेल्या म.वि.प्र.अंतर्गत वैदयकीय महाविदयालयातील आहे.जेथे नव्याने वैदयकीय क्षेत्रात येऊ पाहणार्यानां शिक्षण दिले जाते तिथेच असे चुकिचे उपचार होत असतील तर ही भयंकर गंभीर बाब आहे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

