भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
जय विजय शिक्षक पतसंस्था आणि जय विजय शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा तालुकास्तरीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रमशील विद्यार्थी प्रिय तंत्र स्नेही शिक्षक दिपक परचंडे यांना नुकताच जाहीर झाला आहे.
2018 सालापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी नं. 2 येथे कार्यरत असून सुरुवातीला शाळेची अवस्था ही फार बिकट झालेली होती अशा परिस्थितीमध्ये दिपक परचंडे यांनी हे सर्व आव्हानात्मक परिस्थिती हाताळली. शाळेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरुवातीला त्यांनी सर्वात मोठे चॅलेंज असणारे काम म्हणजे शाळेची पटसंख्या. शाळेची पटसंख्या ही अतिशय कमी होती. परिसरातील सर्व पालकांशी संवाद साधून शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांचे मन परिवर्तन, मतपरिवर्तन, विद्यार्थ्यांच्या विश्वास देऊन शालेय पटसंख्या ही वाढवली. ही शाळा वस्तीवरील शाळा असल्याने परिसरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही फार कमीच होती.६ पटापासून ते ४२ पटापर्यंत पटसंख्या पोहोचली. शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे.
या उद्देशाने त्यांनी शालेय स्तरावर अनेक उपक्रमांची आयोजन केले, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दशसूत्री या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली होती, हा उपक्रम शाळेमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. शाळा प्रवेश पूर्वतयारी मेळावा, बाल आनंद मेळावा, दशसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, शैक्षणिक सहलीचे आयोजन, शिवारभेट, व्यवसाय भेट, संविधान वाचन उपक्रम, मला बोलायच मी बोलणारच उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, टॅलेंट हंट स्पर्धा आयोजन, शालेय साहित्याचे वाटप, शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण, वृक्षदिंडी, इंदो जपान एक्सप्रेस उपक्रम, वी आर लर्न इंग्लिश उपक्रम, शालेय स्नेहसंमेलन, इको फ्रेंडली गणपती बाप्पा कार्यशाळा, फिट इंडिया हिट इंडिया, सेल्फ डिफेन्स एज्युकेशन, चित्रकला शिबिर, फिजिकल ट्रेनिंग, हर घर तिरंगा अभियान, माझी वसुंधरा सुंदर वसुंधरा अभियान, ड्रेस डे स्पर्धा, एक दिवस आत्मनिर्भर साठी उपक्रम, छंद वर्गाचे आयोजन, विज्ञान प्रदर्शन भेट, शालेय परसबाग, शालेय रंगरंगोटी, दहीहंडी गोपाळकाल्याचे आयोजन, बालवारीचे आयोजन, सुंदर माझे हस्ताक्षर उपक्रम, स्पोकन इंग्लिश उपक्रम, प्रसंगातून शिक्षण उपक्रम, पाढे पाठांतर स्पर्धा उपक्रम, मनोरंजनात्मक शिक्षण उपक्रम, मुक्तोत्तरी प्रश्न उपक्रम, यांसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन करून शिक्षणाचे आनंददायी वातावरण विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण केले.
केंद्रस्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेऊन परचंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र स्तर कबड्डी, खो-खो, लंगडी, समूहगीत गायन, बीट स्तरावर समूहगीत गायन, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये यश संपादन केलेले आहे.
सुरुवातीला विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्यावेळेस ग्रामपंचायत तांदुळवाडी यांच्या सहकार्यातून बोरवेल घेऊन त्यामध्ये मोटर टाकून पिण्याच्या पाण्याची सोय केली. शाळेत वीज पुरवठा नव्हता, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने वीजपुरवठा चालू करून घेतला, वर्ग खोल्यांमध्ये कोणतेही प्रकाशाची सोय नव्हती, अशा वेळेस स्वतः १२ हजार ५०० रुपये खर्च करून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये लाईटची सोय केली. शाळेत साऊंड सिस्टिम नसल्याने शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास अडचण येत होती तेव्हा स्वतः साडेचार हजार रुपये साऊंड सिस्टम खरेदी केली, करांडेज चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून शालेय अंतरंग व बाह्यंग हे रंगरंगोटी करून घेतले, ग्रामपंचायत तांदुळवाडी यांच्या सहकार्यातून आज पर्यंत साधारणपणे अंदाजीत रक्कम १२ लाख रुपयेची कामे शाळेसाठी केलेली आहेत. त्यामध्ये संरक्षक भिंत ही साधारणपणे अडीचशे फुटापेक्षा जास्त आहे, भव्य असा कलामंच, रॅम्प दुरुस्ती, झेंडा बांधणी, सौर प्रोजेक्ट, एलईडी प्रोजेक्ट, शालेय आवर भिंत गेट, मुलांचे स्वच्छतागृह दुरुस्ती, मुलींचे स्वच्छतागृह दुरुस्ती अशा प्रकारचे कामे करून घेतलेले आहेत. शाळेसाठी लोकसभागातून प्रिंटर, खुर्च्या, भिंतीवरील घड्याळ हे साहित्य खरेदी केले.
दिपक परचंडे यांना तालुकास्तरीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत तांदुळवाडी यांच्याकडून अभिनंदन होत आहे. माळशिरस तालुका गटशिक्षणाधिकारी महामुनी , केंद्रप्रमुख जमादार , शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव व सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.