पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर संकटसमयी नेहमीच लोकांच्या सेवेसाठी धावून येणाऱ्या तालुका पोलिसांनी भीमा नदीच्या काठी पूरपरिस्थितीची सामना करत असलेल्या रहिवाश्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून माणुसकिचे दर्शन घडविले आहे. रविवार दि२८ रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन कडून भीमा नदीकाठी असलेल्या गोरगरीब लोकांना मागील चार-पाच दिवसापासून नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे गरजवंत गोरगरीब लोकांना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने धान्याचे किट वाटप करण्यात आलेले आहे.
सदर किटमध्ये जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये शेंगा तेलाचे पाकीट साखर कांदा पोहे मिरची पावडर पाकीट चहापावडर व तांदूळ असे किट तयार करून प्रत्येक कुटुंबाला एक पाकीट वाटप करण्यात आलेले आहे . मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळित झाले असून नदीकाठी राहणारे लोक अत्यंत विदारक अवस्थेत जीवन जगत होते, अशा वेळी पोलिसांतील माणुसकी जागी झाली असून तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्याने या लोकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर हे एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर पोलीस अधिकारी असून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस प्रशासनाचे ब्रीदवाक्य आचरणात आणून तालुक्यातील जनतेला न्याय देत आहेत,अनेक गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचा हातखंडा असून विविध समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असतात.