पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावरील पूल होणे अत्यंत गरजेचे आहे.अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शेळवे येथील या कासाळगंगा ओढ्यावर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर भीमा नदीच्या पाणीपत्रात वाढ झाल्यानंतर भीमा नदीच्या बॅक वॉटरमुळे हा पूल लगेच पाण्याखाली जातो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद होते.तसेच कासाळगंगा ओढ्यावरील पाणलोट क्षेत्रामध्ये कटफळ महूद भाळवणी गार्डी जैनवाडी धोंडेवाडी उपरी पळशी सुपली बंडीशेगाव शेळवे वाडीकुरोली येथे पाऊस झाल्यानंतरही हा पूल पाण्याखाली जातो त्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करावी लागते.
त्यामुळे या ओढ्यावरील पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर या पुलावरून येणारे हजारो शेतकरी, कर्मयोगी कॉलेज साठी येणारे विद्यार्थी यांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद होतो या पुलावरून येणारे जाणारे नांदोरे नेवरे तरटगाव शेवते पटवर्धन कुरोली पिराची कुरोली देवडे खळवे जांभूळ शेळवे वाडी कुरोली तसेच नदीकाठच्या अनेक भागातील शेतकऱ्यांचा मार्ग बंद होतो. या पुलाचा वापर शेतकरी भाजीपाला पंढरपूरच्या बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी तसेच फळबाग शेतकरी पंढरपूरला मार्केट कमिटी कडे जाण्यासाठी तसेच जनावरांच्या वैरणीसाठी या पुलाचा उपयोग करतात. परंतु या पुलावरती पाणी आल्यानंतर वाहतूक बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शेळवे वाडी कुरोली पटवर्धन कुरोली नांदोरे पिराची कुरोली या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थीही या पुलाचा वापर करतात पुलावरील वाहतूक बंद झाल्यामुळे त्यांचेही शैक्षणिक नुकसान होते या पुलावरती पाणी आल्यानंतर अनेक मंत्री खासदार आमदार महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक वेळा भेटी दिलेले आहेत. ग्रामस्थांना या पुलाबाबत अनेक वेळा आश्वासनही देण्यात आलेली आहेत तरी पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावरील पूल होणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक उंचीचा पूल झाला तर शेतकऱ्याचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य काळामध्ये फायदा होईल तसेच भविष्यकाळात संत तुकाराम महाराजांची पालखी ही या मार्गावरून पंढरपूरला जाऊ शकते त्यामुळे हा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे याकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे व या पुलाची उंची वाढवण्यासाठी तात्काळ सुरुवात करावी.
ॲड .नवनाथ पाटील शेळवे गावचे पोलीस पाटील