बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी तालुका इंदापूर येथे कादंबरी महिला पतसंस्था व कादंबरी दुध संकलन केंद्र निरवांगी व हिंदुस्तान कॅटल फिड बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे तज्ञ सल्लागार विश्वस्त शिवाजीराव पोळ पाटील हे होते. तसेच हिंदुस्तान कॅटल फिड चे जनरल मॅनेजर अजय पिसाळ . नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल पवार. सचिव पांडुरंग पोळ पाटील. तसेच विश्वस्त उत्तमराव पोळ पाटील तसेच कादंबरी दूध संकलन केंद्राचे चेअरमन कुलदीप उर्फ पप्पू दशरथ पोळ पाटील त्याच प्रमाणे ग्रामस्थ मा. सोसायटीचे चेअरमन संतोष पोळ पाटील. सोसायटी चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंखे . सोसायटीचे संचालक महादेव चव्हाण. डॉक्टर अक्षय रणवरे हिंदुस्तान कॅटल फिड चे ऑफिसर विनोद वेसकर व मार्केटिंग ऑफिसर रामदास मेटकरी . प्रतीक माळी . इ मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचेतज्ञ सल्लागार विश्वस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी बापू पोळ पाटील होते
या वेळी बोलताना पोळ म्हणाले की तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास शैक्षणिक साहित्य वह्या व इतर साहित्य चे विद्यार्थीना हिंदुस्तान कॅटल यांच्या माध्यमातून मदत होत आहे यांचा सार्थ अभिमान आम्हा ला व संस्थेला वाटत आहे.तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातूनही विद्यालयास भरघोस निधी मिळाल्याचे उदगार त्यांनी काढले व त्या बद्दल आभार व्यक्त केले .
हिंदुस्तान कॅटल च्या माध्यमातून विद्यार्थीना शैक्षणिक साहित्याची मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले.हिंदुस्तान कॅटल फिड चे मार्केटिंग ऑफिसर रामदास मेटकरी म्हणाले की या पुढे ही विद्यालयास कंपनीच्या मार्फत शैक्षणिक साहित्याची मदत केली जाईल .
कादंबरी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन कुलदीप उर्फ पप्पू दशरथ पोळ पाटील म्हणाले की हिंदुस्तान कॅटल फीड च्या माध्यमातून मदत होत आहे यांचा आम्हाला सार्थ अभिमान होत आहे
तसेच कादंबरी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे समारोप व आलेल्या मान्यवरांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण शिरसट यांनी केले सूत्रसंचालन सुधाकर भोग यांनी केले या वेळीस कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

