भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज वार शुक्रवार दिनांक १२/०९/२०२५ रोजी आपल्या वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेत भाळवणी गावच्या नागरिक राजश्री राजेंद्र ताड यांनी सदिच्छा भेट दिली व प्रशालेच्या शैक्षणिक कामाबाबत तसेच प्रशालेतील राबवले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम याबद्दल प्रशालेचे कौतुक केले.
यावेळी प्रशालेच्या वतीने राजश्री राजेंद्र ताड यांचा प्रशालेच्या सहशिक्षिका पी.पी.काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व भाळवणी गावचे माजी सरपंच व संचालक सुनिल पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

