पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील वाखरी, गोविंदनगर येथील पारधी समाज वस्ती इथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिम यावलकर, पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली पहाट कार्यक्रम अंतर्गत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गोविंद नगर वाखरी येथील पारधी समाजातील मुला -मुली करता व समाजातील लोकांकरिता दिनांक 22/09/ 25 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रेखा घनवट यांनी दिली.
यावेळी सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे योजनांची माहिती देण्यात आली. समाजातील मुलांना शिक्षणा संदर्भात काही अडीअडचणीची माहिती घेण्यात आली. शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्याचा लाभ घेण्यास सांगण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना याच्या विषयी माहिती देण्यात आली. जातीचे दाखले पॅन कार्ड आधार कार्ड रहिवासी दाखला घरकुल संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी सर्वांना खाऊ म्हणून बिस्कीटचे वाटप करण्यात आले.
वरीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे त्यांचा आम्ही पाठपुरावा करून त्यांना योग्य त्या सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.अशी माहिती घनवट यांनी दिली.

