गुरुजी विना शाळा पोरकी झाली
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यात महिम गावात एका वस्तीवर इ 1ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग असणारी दोन शिक्षकी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवाडी (महिम )आहे.
मूलभूत साक्षरता व गुणवत्तेत अग्रेसर असणारी, मुलांचा सर्वांगीण विकास करणारी, पालकांच्या जाहिरातीवर चालणारी, व महिम परिसरात आपल्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी वेटिंग वर असणारी शाळा, भौतिक सुविधांचा अभाव असताना,धोकादायी खोल्या असतानाही झाडाखाली भरणारी शाळा,मारुतीच्या मंदिरात भरणारी शाळा ,सांगोला तालुक्यात सतत सात वर्ष पटाची हॅट्रिक करणारी शाळा दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षकांच्या प्रशासकीय बदलीमुळे शिक्षकां विना पोरकी झाली.
प्रशासकीय बदली मध्ये सोलापूर जिल्ह्यात एकाही शिक्षकांनी शाळा घेण्याचा धाडस न केल्यामुळे शेवटपर्यंत शाळा शून्यशिक्षकी राहिली. सहकारी कामसु शिक्षक अभिमन्यू कुटे यांनी शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मोलाची साथ दिली. ते बदलून दुसऱ्या शाळेवर गेले व हजर झाले. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकच नसल्यामुळे आजही ती शाळा सोडून बदली झालेल्या शाळेवर जाण्याचे धाडस होईना कारण कारण समोर जीव लावणारी निरागस मुले दिसत आहेत.
शासन मराठी शाळा देशोधडीला लावण्याचे काम करत आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत निःशब्द,प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी हीच आशा व विनंती.
गणेश जगताप
सरांचा कार्य तर चांगला आहेच हो पण ,शाळेचं भयानक वास्तुस्थिती मांडली आहे शाळेला शिक्षक भेटले नाही आणि लोकांनी कमेंट केल्यात सुपर so proud . छान पण त्यांनी कारंडेवाडी शाळेला शिक्षक नसल्याबद्दल ची खंत व्यक्त केली आहे त्यासाठी त्यांनी तो लेख लिहिला आहे .तर गावकऱ्यांनी मुलांच्या पालकांनी शाळेला शिक्षक भेटावं म्हणून काहीतरी केले पाहिजे ना तिथे जाऊन .व जे योग्य आहे ते करावे.
पृथ्वीराज बंडगर

