पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी पंचायत समिती शेतकी भवन या ठिकाणी पोलीस पाटलांची पाच वाजता बैठक बोलावली होती.
या बैठकीमध्ये प्रांत अधिकारी सचिन इथापे म्हणाले की पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना गावात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसेच कोणत्याही गावात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिली. तसेच येणाऱ्या निवडणुकीबाबत पोलीस पाटलांनी सतर्क रहावे असेही सुचविले. गावात काही अनुचित प्रकार व शांतता भंग करणारे कोणी असेल तर त्याची माहिती द्यावी अशी आव्हान केले. पोलीस पाटलांनी सतर्क राहून गावाविषयी गोपनीय माहिती दिली पाहिजे असेही सुचविले तसेच अवैध धंद्याबाबत काही माहिती असेल तर ती लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात पोलीस पाटलांनी अवगत करावी अशी ही सूचना दिली. यावेळी पोलीस पाटलांना सुमारे पंधरा मिनिटे प्रांत अधिकारी सचिन इथापे यांनी मार्गदर्शन केले .
तसेच पोलीस पाटलांच्या ही काही अडचणी व समस्या असतील तर त्याही अडचणी व्यक्त करण्यासाठी पोलीस पाटलांना संधी दिली.
यावेळी शेळवे पोलीस पाटील ॲड.नवनाथ पाटील, धोंडेवाडी पोलीस पाटील नितीन देठे पाटील, पिराची कुरोलीचे शरद कौलगे पाटील, वाखरीचे बाळू शेंडे, सुपलीचे पवार जैनवाडीचे स्मिता दानोळी, गाडीचे सोमनाथ निंबाळकर, सोनके आबासाहेब पगारे, पळशी अशोक लोखंडे, उपरीचे दत्तात्रय हेंबाडे व तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

