पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या मेळाव्यास विभागातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
पालक प्रतिनिधी म्हणून श्री. उत्तम सुरवसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. दरम्यान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
या पालक-शिक्षक मेळाव्याचे ध्येय म्हणजे विद्यार्थींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यात सशक्त संवाद व सहकार्य निर्माण करणे हे होय. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक विकासाला चालना देणे, घरगुती अभ्यासपद्धती व शिस्तीबाबत चर्चा करणे, तसेच करिअर मार्गदर्शन व नोकरीच्या संधींबाबत माहिती देणे ही उद्दिष्टे यामागे होती.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालक मेळाव्याचे उद्दिष्ट व उपयुक्तता स्पष्ट केली. तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत पवार यांनी केले. पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. चेतन पिसे, प्रा. चंद्रकांत देशमुख आणि विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

