म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज सचिन सरतापे
महाराष्ट्र न्यूज १८ चॅनल व पंचरत्न मित्र मंडळ मुंबई यांचे वतीने आयोजित इंडियन एक्सलेन्स स्टार अवॉर्ड २०२५ व युवा कला महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि . १४ सप्टेबर रोजी विकास कॉलेज कन्नमवार नगर , विक्रोळी पुर्व मुंबई या ठिकाणी पार पडला.
सातारा जिल्ह्यातील सतिश भोसले , ग्रामपंचायत अधिकारी यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार , माधव राऊत , रा .मार्डी यांना आदर्श लोकसेवा पुरस्कार , ॲड . विजय कदम यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार , डॉ . संजय गिरीबुवा यांना आदि शंकराचार्य समाजभुषण पुरस्कार व देवानंद कांबळे यांना राष्ट्रभूषण साने गुरुजी जीवन प्रेरणा पुरस्कार देऊन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत , बिग बॉस फेम प्रसिद्ध गायक संतोष चौधरी ( दादूस ) , अध्यक्ष अशोक भोईर , डॉ संजय भोईर व मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कारगिल युद्धात सहभागी होऊन शौर्व गाजविणाऱ्या विर रत्नांचाही सन्मान करण्यात आला तसेच युवा कलामहोत्सव या वेळी संपन्न झाला या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक व मान्यवरांची उपस्थिती होती

