पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व पंढरपूर तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीने झालेल्या पंढरपूर तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली येथील मुलींच्या संघाने 14 वर्ष 17वर्ष व 19 वर्ष या तिन्ही वयोगटात निर्विवादपणे प्रथम क्रमांक प्राप्त करत तिहेरी मुकुट संपादन केला.
खो - खो खेळातील आपल्या उज्वल यशाची गेल्या दहा वर्षाच्या यशाची परंपरा कायम ठेवत तिन्ही गटात निर्विवादपणे तालुकास्तरावर यश संपादन केले.
14 वर्षे मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात वसंतराव काळे प्रशालेच्या संघाने मॉडर्न हायस्कूल पिराचीकुरोली चा 1 डाव 9 गुणांनी पराभव केला. सतरा वर्ष मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात आदर्श प्रशाला शेवते च्या संघाचा 1 डाव 15 गुणांनी व 19 वर्ष मुलींच्या गटात अण्णासाहेब पाटील विद्यालय तिसंगीचा 1 डाव 4 गुणांनी पराभव करून प्रथम क्रमांक प्राप्त केले असून तिन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत हे संघ पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील. या सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार भंडीशेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रासकर मॅडम, संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल जाधव, सहकारी गौतम लामकाने, समाधान काळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणरावजी काळे सर्व संचालक मंडळ,प्राचार्य एस. आर. कुलकर्णी पर्यवेक्षक एस.एम. शेख, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

