पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी (ता. पंढरपूर) येथे भवानी देवीचे पुरातन ग्रामदैवत असून दररोज 100 ते 200 व नवरात्र मध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी 500 ते 600 भाविक येत असतात. दरवर्षी कोजागिरी पोर्णिमेला यात्रा भरते. या देवतेच्या दर्शनासाठी वर्षभरात अंदाजे 2 ते 3 लाख भाविक येत असतात.
श्री. भवानीदेवी मंदिर हे ऐतिहासिक पुरातन मंदिर असून सदर मंदिरास सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याने पर्यटन खात्याअंतर्गत या मंदिराच्या सुशोभीकरणास 5 कोटी निधी मंजूर व्हावा असे निवेदन मंदिर समितीचे सदस्य तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आज मुंबई येथे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना सादर केले.
सदरचा निधी प्राप्त झाल्यानंतर मंदिराचे सुशोभीकरण होऊन आजूबाजूचा परिसर विकसित होणार असून भाविकांना चांगल्या सोई सुविधा व पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले.

