सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सन २०२५ च्या दीपावली सणानिमित्त शोभेच्या दारू (फटाके) विक्रीसाठी तात्पुरते परवाने देण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक विक्रेत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (LE-५) सेतू कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे प्राप्त करून १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) गृह शाखा, जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दूध डेअरी शेजारी सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
* अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
1. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
2. ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्र
3. वयाचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला (LC) किंवा जन्म प्रमाणपत्र
4. संबंधित जागेचा ७/१२ उतारा किंवा मिळकत उतारा, जागेचा नकाशा व स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र
5. स्वघोषणापत्र
* परवाना शुल्क:
- अर्जाच्या चौकशीअंती रु. ६००/- चलनाद्वारे भरावे
- यापूर्वी मिळवलेल्या परवान्याची प्रत जोडणे आवश्यक
* महत्त्वाच्या अटी:
- अर्ज सादर केल्यानंतर पोलीस विभागाकडून चौकशी अहवाल प्राप्त होणे आवश्यक आहे
- ३० सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
- शासन व न्यायालयाकडून प्राप्त निर्देश, अटी व शर्ती अर्जदारांवर बंधनकारक राहतील
- परवाना देण्याचा अंतिम निर्णय परवाना प्राधिकाऱ्यांचा असेल

