ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर तेज न्यूज
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या सलग दोनदा आमदार राहिलेल्या माजी आमदार सौ. निर्मलाताई गावित यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे पाश्र्वभूमीवर निवडणुक लढवावी व त्यामुळे मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आधिकाधिक मजबुत होऊन विकासाला चालना मिळेल अशी भावना शिवसैनिकानीं व्यक्त केली आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातुन महायुतीचे आमदार हिरामन खोसकर हे आहेत.मात्र ते महायुतीचे आमदार असले तरी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे च असल्यासारखे असुन शिवसेना नेते,शिवसैनिक व त्यांचे फारसे सुर जुळत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्यां कामानां फारसा न्याय मिळत नसल्याचीही खाजगीत चर्चा जोरशोरसे आहे.
. त्यामुळे मतदारसंघातुन शिवसेनेचा खमक्या व प्रभावी नेता सक्षमपणे उभा राहण्याची गरज कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
शिवसेनेकडे माजी आमदार सौ. निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ व पांडुरंग बाबा गांगड असे तीन माजी आमदार व प्रभावी नेते आहेत. मेंगाळ व गांगड यांचा ठाकुर समाजावर दांडगा प्रभाव आहे तर सौ. गाविताचां मतदारसंघात चांगला दबदबा आहे.
हे नेते एकत्र येऊन त्यांनी प्रभावीपणे काम केले तर मतदारसंघात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी चर्चा नागरीक व्यक्त करत आहेत.
श्री.गावित रिंगणात उतरणार ?
जलसंपदा विभागातुन सेवानिवृत्त झालेले व सौ. गावित यांचे दहा वर्षाचे काळात उपसा सिंचनची अभुतपुर्व कामे करणारे श्री.रमेश गावित हे जि.प. निवडणुकीत नशीब आजमावणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
रमेश गावित हे उभ्या मतदारसंघाला सुपरिचीत असुन अनेक जि.प. गटातुन त्यांनी उमेदवारी करावी अशी मागणी होत आहे.

