भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसस्थेच्या वतीने दिल्या जाणारा आदर्श शाळा पुरस्कार यावर्षी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी मुली यांना जाहीर झाला.
आपल्या सर्वांचे उत्तम सहकार्य ' इथल्या सर्व शिक्षकांचे अतोनात कष्ट यामुळे हे सर्व शक्य झालं .पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी घाटुळे मंगल कार्यालय अनगर येथे दुपारी दीड वाजता आहे . आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात तर नक्कीच या पुरस्काराची शोभा वाढेल . वास्तविक पुरस्कार म्हणजे इथे थांब न नव्हे तर अधिकाधिक काम करण्याची प्रेरणा आपणास मिळावी म्हणून दिलेली एक चुणुक असते .
आपल्या भाळवणी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांनी शाळेला दिलेल्या सुविधा असतील ' किंवा शाळेकडे बघण्याचा उत्तम दृष्टिकोन असेल ' यामुळे शाळेची गुणवत्तावाढ होतेच परंतु शाळेला येणाऱ्या अडचणी असतील यावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होतं . आपल्या सर्वांच्या सहकार्याने ' शाळेच्या प्रगतीचा रथ आपण पुढे नेऊ या .