पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक २२/०९/२०२५ रोजी सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली येथे अवैध जुगार चालु असलेबाबत माहिती मिळाल्याने आम्ही सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर व पोसई/महादेव पिसाळ असे पंढरपूर शहर पोलीस ठाणेस दि. २२/०९/२०२५ रोजी ठाणे दैनंदिनीस नोंद ०२/२०२५ नोंद करुन आमचे सह ०२ पोलीस पथकाचे सोबत पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली येथे एका खोलीत अवैधरीत्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा कारवाई केली आहे.
पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिरा जवळ, डोंबे गल्ली येथील रोहित उर्फ लाला पानकर याचे घराचे शेजारी असलेल्या बोळातून आत गेल्यावर एका खोलीत १३ इसम हे ५२ पत्याच्या डावावर पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना दिसले. सदर ठिकाणी ४२ इंची टि.व्ही वरती सी.सी.टी.व्ही. फुटेज निरीक्षणा करीता वापर करण्यात आलेला आहे तसेच खोलीमध्ये गादया खुडच्या जुगार खेळण्याचे इतर साहित्य होते. पोलीस पथकास सी.सी.टि.व्ही फुटेज मध्ये पाहून सदर १३ इसमापैकी ०९ इसम तेथुन पळुन गेले. व ०४ इसम मिळून आले.
सदर खोलीमध्ये जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, एक रिक्षा, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरीता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल व ५२ पानी पत्याचे डाव त्यामध्ये १) रोख रक्कम १७,१८०/- २) दुचाकी वाहने किंमत रुपये ६५,०००/- ४) जुगार साहित्य किंमत रुपये हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत पंढरपुर शहर पोलीस ठाणेस १३ जुगार खेळणा-या इसमां विरुध्द् महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४ व ५ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ५९७/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४,४५,०००/- ३) भ्रमणध्वनी संच (मोबाईल) किंमत रुपये १६,१२० असा एकुण ५,४३,३०० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/महादेव पिसाळ, पोह/१८६ निलेश रोंगे, पोह/३५३ सुजित उबाळे, मपोहेकों/२८१ शितल राउत, पोना/१३८३ सिताराम चव्हाण यांनी पार पाडलेली आहे.

