पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
शासन स्तरावर काही नवीन जिल्हे व काही तालुके निर्माण करायच्या हालचालींना सुरुवात झाली आहे जिल्ह्याचा विषय जेव्हा चर्चेला जातो तेव्हा राज्यातील सर्वात मोठे असे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर नगरीचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो चर्चिला जातो पंढरपूर जिल्हा व्हावा या करता कैलासवासी माजी आमदार पांडुरंग तात्या डोंगरे यांनी अंतुले मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले परंतु काही राजकीय लोकांच्या इच्छाशक्ती अभावी पंढरपूर जिल्हा होण्याचे स्वप्न अपुरे राहिले.
आता शासन पातळीवर महसुली कारभारात सुसूत्रता यावी महसुलात वाढ व्हावी या दृष्टीने विचार होऊन नवीन असे 18 जिल्हे व नवीन 81 तालुके याचे निर्मिती करण्याचा शासन स्तरावर विचार चालू आहे. पंढरपूर जिल्हा वा वा ही अनेक वर्षाची इच्छा असून तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्याच्या सर्व स्तरातून तसेच विठ्ठल भक्त वारकरी यांची ये जात चालू असते याकरता पंढरपूर जिल्हा करणे गरजेचे आहे या ठिकाणी शासकीय कार्यालयाकरिता मुबलक प्रमाणात जागा व काही इमारती अद्याप धूळ खात पडून आहेत शिवाय जिल्ह्याला लागणारे जवळजवळ 75 टक्के कार्यालय पंढरी नगरीत कार्यरत आहे. नागरिकांचा वेळ खर्च याचा विचार केला तर पंढरपूर हे जिल्हा म्हणून मध्यवर्ती ठिकाण सोयीचे आहे पंढरपूर पासून माळशिरस हे साठ किलोमीटर अंतर आहे मंगळवेढा पंचवीस ते तीस किलोमीटर आहे सांगोला तेवढेच असावे त्यामुळे पंढरपूरला मंगळवेढा माळशिरस सांगोला करमाळा किंवा माढा हे तालुके जवळचे असून नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे आहेत.
त्यामानाने सोलापूरला प्रशासकीय काम करता व जिल्हाधिकारी कार्यालयात जाणे हे नागरिकांना काही वेळला रडत नाही गेल्यानंतर अधिकारी भेटतीलच असेही नाही त्यामुळे वेळेचा अपव्यय होणारा खर्च वाया जाणारा दिवस यामुळे नागरिकांचे आजही मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत आहे याकरता मध्यवर्ती असे पंढरपूर हे ठिकाण प्रशासकीय व नागरिकांच्या हिताच्या सोयीच्या दृष्टीने सोयीचे आहे याकरता पंढरपूर जिल्हा झाल्यास सर्वांचीच गैरसोय होणार आहे याकरता पंढरपूर जिल्हा होणे गरजेचे आहे.
याकरता राजकीय शक्तींनी पाठपुरावा करणे तितकेच गरजेचे आहे नुकतीच कासेगाव येथे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी एमआयडीसीसाठी प्रयत्न केले असून सोलापूर ऐवजी पंढरपूरला जिल्हा झाल्यास नागरिकांच्या सोयीसाठी कसे सुखकर आहे यापूर्वीही येथील स्थानिक नेतृत्व आणि प्रशासनाला पटवून दिले होते परंतु काहींच्या राजकीय खेळीमुळे पंढरपूरचा जिल्हा विषय मागे पडला पंढरपूर जिल्हा व्हावा ही सन 1980 पासून ची मागणी आहे.

