भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी सभा मंडपात रविवार दिनांक 14 /12/ 2025 रोजी पहाटे 5 वाजून 55 मिनिटांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गुलालाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 13 /12/ 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर रात्री 9 वाजता भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुलालाच्या कार्यक्रमा नंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


