पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील उघड्यावरील पशुहत्या व मांस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेते विरोधात पंढरपूर नगरपरिषद उपमुख्याधिकारी सुर्यवंशी यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व परिसरात सर्रासपणे रस्त्याच्या कडेला उघड्यावर बोकड, शेळी, बकरी,कोंबडी आधीची कत्तल सरास (कापणे) व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर उड्यावर जे प्राणी कापण्याचे ओंगळवाणी प्रकार रस्त्याच्या कडेला चालू आहेत त्या विरोध सदरचे निवेदन दिले असून ते त्वरित बंद करण्यात यावेत.
अलीकडेच शहराच्या व उपनगराच्या परिसरात रस्त्याच्या कडेला उघड्यावर वरील प्राणी कापले जातात व त्याचा विष्ठा व आतडे,मास रक्त व अनावश्यक अवयव हे सार्वजनिक ठिकाणी ठाकले जातात यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. रस्त्याने येणारे जाणारे लहान मुले मुली,वृद्ध स्त्री-पुरुष व नागरिक ये जा करतात त्यांना याचा नाहक त्रास होत आहे तसेच पहाटे,सकाळी,रात्री वेळेस हा प्रकार चालू आहे.याकरता मास विक्री उघड्यावर प्रकार बंद झाले पाहिजे अशी माहिती नागरिकांतून होत आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला उघड्यावर कापलेले प्राणी व त्याचे अनावश्यक अवशेष रस्त्याच्या कडेला टाकल्याने ते खाण्यासाठी त्या मासाच्या वासाने मोकाट कुत्री हि रस्त्यावर रात्री धुमाकूळ घालताना दिसतात.
तसेच मास विक्री करणारे उघड्यावर फेकून दिलेले अनावश्यक मास व इतर विष्ठा फेकल्याने दुर्गंधी लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकरता येत नाही.याकरता असे उघड्यावर प्राणी कापण्याचे प्रकार त्वरित बंद करण्यात यावे रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी मासाचे तुकडे व अनावश्यक विष्ठा उघड्यावर फेकूने यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पंढरपूर दक्षिण काशी म्हणून जग प्रसिद्ध आहे तसेच वारकरी संप्रदायात मांसाहार वर्ज्य असुन पंढरपूर येथे दररोज वारकरी, भाविक भक्तांच्या मोठ्या संख्येने येतात आणि पंढरपूर शहराच्या विविध भागातुन प्रवेश करताना मास विक्री करणारे व्यावसायिक कोणीतीही दक्षता घेतली जात नाही हे चित्र पाहवयास मिळत आहे.याबाबत पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती कारवाई करणार का हे पाहावे लागेल


