श्रीक्षेत्र पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मा. सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांचे उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर सात दिवस दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत चालू असणाऱ्या नवरात्र संगीत महोत्सवाच तिसर गायन पुष्प भैरवी किरपेकर आणि मधूरा किरपेकर या भगिनींनींच्या स्वरांनी गुंफल.
सुरुवातीला सदस्या शकुंतला नडगिरे ,पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा,संजय कोकीळ यांचे शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली.सुरुवातीला राग रागेश्री ने सुरुवात करत शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली.त्यानंतर पंढरीचा वास चंद्रभागे स्नान,पद्मनाभा नारायणा,पंढरपूरीचा निळा,सोहम डमरु बाजे,संतभार पंढरीत,आणि हवेली संगीत गायनाने रंग आणला. पंढरपूरकरांसाठी खास मेजवानीच ठरली कार्यक्रमाची सांगता अवघा रंग एक झाला या भैरवी वने करत
रसिकांंसाठी ही मैफिल अविस्मरणीय ठरली.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला गीत इनामदार हार्मोनियम नचिकेत हरिदास पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.सुत्रसंचनलन बापू सावळे सरांनी केले.यावेळी पंढरपूर कला रसिकांनी शेवटपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.पुढे २९ तारखेपर्यंत चालणाऱ्या महोत्सवास उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे वतीने करण्यात आले.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कर्मचारी वर्ग अधिक परिश्रम घेत आहेत