इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वालचंदनगर येथील गणराज ग्रुप गणेशोउत्सव मंडळ आयोजित कै संतोष हनुमंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन वार- रविवार, दिनांक-३१/०८/२०२५ रोजी करण्यात आले होते त्या रक्तदानाचा शुभारंभ श्री सुरेश गायकवाड, श्री सुभाष गायकवाड,श्री प्रकाश गायकवाड,श्री भारत नलवडे आणि वालचंदनगरचे सरपंच श्री संतोष (कुमार) गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी यांनी श्री सचिन गायकवाड व श्री संदीप गायकवाड आणि श्री विक्रम मोरे याच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाथ दाखवून गेल्या दोन दिवसांपासून खूप कष्ट घेतले आणि त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ७५ बॅग रक्त जमा झाले. तसेच अक्षय रक्त पेढी सोलापूर, याच्या सर्व पदधिकारी याचे देखील मनापासून खूप आभार त्यांनी वेळात वेळ काढून ह्या कॅम्पचे नियोजन केले.
वालचंदनगर मधील तसेच बाहेरगावचे सर्व मित्रपरिवार जेष्ठ मंडळी तसेच वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड वालचंदनगर मधील सर्व कामगारांचे मनापासून खूप आभार आपल्या सर्वामुळे रक्तदाना सारखा छान उपक्रम आमच्या मंडळाने पार पाडला.

