पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) यांच्या राज्यस्तरीय राबविण्यात आलेल्या ‘सांगा टक्के बक्षीस पक्के’ या उपक्रमात IIT कॉम्प्यूटर्स, पंढरपूर येथील विद्यार्थिनी कु. ऋतुजा धनाजी साळुंखे (रा. मुंढेवाडी) हिने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल तिचा ₹2000/- (दोन हजार रुपये) चा धनादेश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यावेळी पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे, IIT कॉम्प्यूटर्सचे संचालक नितीन आसबे , दत्ता कळकुंबे , रोहिणी मांजरे , वैष्णवी पाटील , सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. ऋतुजा हिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, तिचे IIT कॉम्प्यूटर्स संस्थेतील मार्गदर्शक व शिक्षकांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे.