पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शेळवे येथे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती अभियान व मोबाईलच्या अतिरिक्त वापर टाळावा यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले.
यावेळी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती वरील पथनाट्य व मोबाईलच्या अतिरिक्त वापर टाळून अभ्यासाकडे मुलांनी लक्ष द्यावे यावर एक पथनाट्य सादर केले.
यावेळी शेळवे येथे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी रेखा घनवट , शेळवे गावचे पोलीस पाटील ॲड .नवनाथ पाटील तसेच पीएसआय शहाजी मोठे, पीएसआय ज्योती भैंनवाड आप्पासाहेब करचे , पोलीस अधिकारी अमर सुरवसे व नंदा मोहिते ,रंगुबाई वाघमोडे ,वर्ष बंडगर ,भाग्यश्री घाडगे ,संगीता काळेल, निर्मला वाघमारे तसेच इंजीनियरिंग कॉलेजचे प्राध्यापक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती रेखा घनवट प्रथम शेळवे गावाला भेटीवर आल्या होत्या. त्यांचे शेळवे गावामध्ये स्वागत करण्यात आले तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.