करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवा निमित्ताने करकंब येथे नादब्रह्म कला फाऊंडेशन यांचेवतीने ज्ञानदेवांचा जन्मदिवस वृक्षारोपण आणि संतवाणी ज्ञानेशांची या कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला श्रीपाद लिंबेकर, बाळासाहेब वास्ते,, नादब्रह्म कला फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे,कविंद्र रेडे, पत्रकार एल एम जाधव.अशोक माळी महादेव दुधाणे,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते माऊलींच्या आणि चौंडेश्वरी मातेच पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले.
प्रास्ताविकामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सांगत जगाची माऊली प्रत्येकाच्या हृदयात वास करत आहे.माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीतून एकतेचा संदेश दिला असं सांगितले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीलाच जय जय राम कृष्ण हरी या सुंदर वारकरी बीज मंत्रांच्या घोषात उच्चार गायन करत रसिकांना डोलायला भाग पाडले.त्यानंतर रुप पाहता लोचणी,भेटी लागी जीवा, माझे माहेर पंढरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, श्रीराम जानकी बैठे है मेरे सिनेमे,आदी संतांचे अजरामर अभंग सादर करत इवलेसे रोप लावियेले द्वारी भैरवीने कार्यक्रमाची सांगता करत.माऊलींचा जन्मदिवस साजरा केला.त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला गणेश लोहार हार्मोनियम अभिषेक शिंदे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे स्वरसाथ मनोहर नरवाडे,साईराज लाहुटी यांनी करत संतवाणीला शोभा आणली.यावेळी करकंब पंचक्रोशीतील माऊली भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.याआधी मोडनिंब रोडवर करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने संतांचे झाड अभियानांतर्गत माऊलींच्या नावाने वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणासाठीचा संदेश दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश दुधाणे,बापू खारे, देविदास काटवटे,विशाल बोधे, चेतन पुरवत,पांडुरंग काटवटे, विश्वजीत शिंदे, नागेश खारे,नंदलाल कपडेकर, देवकी दुधाणे आदींनी अधिक परिश्रम घेतले.