पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व जुनिअर कॉलेज पंढरपूर. या शाळेत मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुलींनी निमंत्रित पाहुण्यांना शिस्तबद्ध व तालबद्ध पद्धतीने मानवंदना देऊन दूरदर्शन निवेदिका डाॅ. वनिताताई घाडगे देसाई यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन ,नृत्य ,कवायत व भाषण सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डाॅ.सौ. वनिताताई घाडगे देसाई. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की भारत देश हा 1947 साली स्वतंत्र झाला.या स्वातंत्र्योत्तर चळवळीच्या काळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवनाचे बलिदान केले. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस इतिहासात सुवर्णाअक्षराणी लिहिला आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ फक्त परकीय राजवटीतून मुक्त होणे असा नाही. तर सर्वांसाठी समान संधी, न्याय आणि बंधुत्व निर्माण करणे असा आहे .आपणाला मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत ओळखून आपल्या देशाला प्रगतीसाठी समृद्धीसाठी व एकतेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे .असे सांगून सर्वांनी एकसंघ राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
तसेच इयत्ता दहावी व बारावी मार्च 2025 यश प्राप्त विद्यार्थ्यांना सूर्योदय एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह या संस्थेने दिलेले शाल व ट्रॉफी पाहुण्यांचे हस्ते देऊन देऊन गौरविण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात ऋषिकेश मोहन बोडके माजी विद्यार्थी यांने प्रशालेस आहूजा कंपनीचे दोन कॉडलेस माईक भेट दिले.शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा.गणेश डुबल यांनी माणले व शेवटी देशभक्तीपर नारे लावुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.