पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.सत्य साई सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई .यांचे वतीने श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वरंम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर मधील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना "
शालेय गणवेशाचे" वाटप सत्यसाई भक्त चंद्रशेखर सर व संपततजी वाघाटे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना संपतजी वाघाटे म्हणाले की विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी घडला तर देश घडेल या उद्देशाने श्री सत्यसाई संघटनेच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढत असलेल्या प्रसार आणि वापर याबद्दल माहिती देऊन ए आय शिक्षण प्रणाली या प्रशालेत सुरू करणार असल्याचे सांगून याचा वापर सर्वांनी क करून घ्यावा असे सांगितले व यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा खजिना मिळणार असून यातून या जगात विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचे पाऊल टाकण्याची संधी मिळेल असेही सांगितले.
पुढे संस्था प्रमुख सल्लागार श्री. विजयसिंहजी पवार म्हणाले की मानव सेवा हीच माधव सेवा या विचाराने ही संघटना सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून सत्य साईबाबांनी नेहमीच सर्वांवर प्रेम करा व सर्वांची सेवा करा असा संदेश दिला असून मुलांनी ए आय शिक्षणाचा वापर करून घेण्याचे आवाहन केले
या कार्यक्रमासाठी दत्ता कोकरे एनसीबी अध्यक्ष विराज पाटील प्राचार्य नंदिनी गायकवाड यांचे सह पालक वर्ग व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होता कार्यक्रम चे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी मांडले तर आभार गणेश डुबल यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरफान शेख, अभिजीत कोष्टी, पुंजाजी ढोले, विजय भंडारे ,माधुरी बोडके, कुमुदिनी सरदार, कल्याणी कांबळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.