सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा शहर अध्यक्ष संजय होमकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
ही नियुक्ती संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि समाजाच्या संघटनबळ वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या नियुक्तीसाठी भास्करभाऊ टोंपे,ईश्वर भाऊ धिरडे, अनंतभाऊ जांगजोड व उषाताई पोरे यांच्या मार्गदर्शन लाभले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ.मिनलताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक श्री संतोष मुळे,पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक सौ.सुचिता महाडीक,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री दिनकर पंतगे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री.चंद्रकांत चुंबळकर, महिला अध्यक्ष सौ.हेमलता चांडोले, जनसंपर्क प्रमुख श्री.अरूण मामा लंगडे, श्री.रविशेठ वनारसे तसेच सर्व समाज बांधव व माता भगिनी यांनी हीआपली उपस्थिती नोंदवली.
या नियुक्तीनंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून,आगामी महासंमेलन अधिक प्रभावी आणि भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत.