मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबई येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. आगामी काळातील कार्यक्रम, संघटनात्मक विषय तसेच कार्यविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली.
आज पार पडलेल्या या बैठकीत भाजपा जिल्हा कार्यकारिणी सह विविध संघटनात्मक मुद्यांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन, मुंबई अध्यक्ष व मंत्री आशिषजी शेलार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रदेश कोअर कमिटीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.