अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज यांच्या अंतर्गत ग्रामीण कार्यानुभव उपक्रमाद्वारे कृषी मित्रांनी रांगोळीच्या माध्यमाने गावचा नकाशा चे सादरीकरण केले .रांगोळी द्वारे रेखाटलेल्या नकाशामध्ये तांदुळवाडी गावातील गावातील रस्ते, शेतजमिनी, विहिरी, पाण्याचे स्रोत, शाळा, देवस्थान, ग्रामपंचायत कार्यालय,आरोग्य केंद्र ,तलाठी ऑफिस, आदी महत्त्वाची स्थळे नकाशावर दाखविण्यात आली.
या नकाशाच्या सादरीकरणावेळी विद्यार्थ्यांनी नकाशातील प्रत्येक ठिकाणांचे स्पष्टीकरण गावातील शेतकऱ्यांना व युवकांना दिले .नकाशा तयार करताना गावातील महिला, शेतकरी, युवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी नकाशा कसा तयार करावा, त्याचा उपयोग काय आहे याची माहिती गावकऱ्यांना समजावून सांगितली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याचा अनुभव मिळाला तर गावकऱ्यांना गावाच्या सर्व संसाधनांचा एकत्रित आढावा घेता आला. भविष्यातील विकास आराखडा तयार करण्यासाठी हा नकाशा उपयुक्त ठरणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले .
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कृषीदूत अविराज पवार, श्रीधर मारकड, सुयश बागल, संदेश मोरे, अनिकेत चव्हाण, महेश गंगथडे, प्रथमेश चव्हाण, विवेक थोरात यांनी केले .या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजचे प्राचार्य .आर .जी . नलावडे ,प्रा. एस. एम. एकतपुरे(कार्यक्रम समन्वयक ) ,प्रा. एम .एम. चंदनकर(कार्यक्रम अधिकारी ) यांचे मार्गदर्शन लाभले .