सांगोला प्रतिनिधी प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आशियाई विकास बँकेमार्फत सांगोला विधानसभा मतदार संघांतील पंढरपूर तालुक्यातील गार्डी ते मोरेवस्ती या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जानेवारी २०२४ मध्ये मागणी करीत त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांनी या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामास 5 कोटी 70 लाख रुपये मंजुर केले आहेत अशी माहिती माजी आम. ॲड. शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी ते मोरेवस्ती या रस्त्यावर साखळी क्रमांक 350 येथे 108 मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी मागील वर्षी ग्रामविकास खात्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांनी मंजुरी दिली आहे.या कामास 5 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी या कामाबरोबरच इतर दोन कामांची मागणी केली होती. त्यापैकी गार्डी ते मोरेवस्ती रोडवरील पुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. सदर काम ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसाहीत गार्डी ते मोरेवस्ती पुलाचे काम मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे गार्डी गावच्या ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.