इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवन व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर यांच्यामध्ये अर्थशास्त्र विभागांतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून असणाऱ्या उद्देशपूर्तीकरिता हा सामंजस्य करार महत्वपूर्ण ठरणार आहे.
या करारानुसार अध्यापन, अध्यापन सहाय्य, संशोधन कार्य, तंत्रज्ञान, जीवन कौशल्ये आणि मूल्ये विकास, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये नवीन क्षमता निर्माण, कौशल्य वाढ, व्यक्तिमत्व विकास, सेमिनार, कार्यशाळा, वेबिनार, आर्थिक साक्षरता विकास इत्यादींद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण असे विविध उपक्रम राबवणे व विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे अशा विद्यार्थी विकासाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी या सामंजस्य कराराचे स्वागत केले व दोन्हीही महाविद्यालयांना या कराराचा नक्कीच फायदा होईल व विद्यार्थी हित लक्षात घेऊन दोन्हीही महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही दिली. सामंजस्य कराराच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील दोन नामवंत महाविद्यालय एकत्र आली याबाबत आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी भिगवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख डॉ. गजानन कदम, IQAC समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब काळे, इंग्रजी विभागाचे डॉ. प्रशांत चवरे, वाणिज्य विभागाचे प्रा. गोविंद अग्रवाल यांच्यासमवेत विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंगाडे, डॉ. अमित शेटे उपस्थित होते.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव ॲड मनोहर चौधरी तसेच इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग आदी मान्यवरांनी पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.