सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.गणेश उत्सव आगमन व श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २९/०८/२०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री.दत्त मंदिर महादेवगल्ली येथे श्री व सौ.आशा सोमेश यावलकर यांच्या शुभहस्ते व परीक्षक, श्री.अतुल ताडेसर, श्री.प्रसाद सोनटक्के परीक्षक (कोल्हापूर), श्री.अतुल उकळेसर,श्री. दयानंद बनकरसर,श्री.रामदास रोंगे गुरुजी,श्री.प्रसाद पाटील सुधाकर कुंभार, श्री. गेजगेसर श्री.दत्त मंदिर व्यवस्थापक श्री. नंदकुमार लहुळकर यांच्या उपस्थितीत तबलावादन स्पर्धेचे उद्घाटन झाले या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी जवळपास ५४ स्पर्धकांची नाव नोंदणी झाली होती ही स्पर्धा सकाळी १० वाजलेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती या स्पर्धेसाठी सांगोला तालुक्याचे माजी आमदार श्री शहाजी बापू पाटील यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धा दिवसभर उत्साही वातावरणात संपन्न झाल्या या या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री गणेश भंडारे यांनी केले या भजन स्पर्धेचे आयोजन श्री. संत गजानन भक्त परिवाराचे मार्गदर्शक,आधारस्तंभ मा.नगरसेवक डॉ.सोमेश्वर यावलकर यांनी केले अशी माहिती संत गजानन भक्त परिवाराचे अतुल उकळे यांनी दिली.
तबला वाद्य वादन स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेते खालील प्रमाणे
या स्पर्धेत पाचवी ते आठवी गट
१) प्रथम क्रमांक - श्रवण नवनाथ माळी - रोख रक्कम ७,००१/-सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
२) द्वितीय क्रमांक - प्रथमेश प्रताप गोरे - रोख रक्कम ५,००१/-सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
३) तृतीय क्रमांक - अक्षरा शशिकांत सुतकर - रोख रक्कम ३,००१/-सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
नववी ते बारावी गट
१) प्रथम क्रमांक - निकिता राजाराम एवळे - रोख रक्कम ७,००१/-सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
२) द्वितीय क्रमांक -मधुवंती सुधाकर कुंभार - रोख रक्कम पारितोषिक ५,००१/- सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
३) तृतीय क्रमांक - षण्मुख चिंतामणी साळे - रोख रक्कम ३,००१/- सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
खुला गट
१) प्रथम क्रमांक - तेजस्विनी अमोल मेटकरी - रोख रक्कम ७,००१/- सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
२) द्वितीय क्रमांक - सुदर्शन रमेश माने - रोख रक्कम ५,००१/- सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
३) तृतीय क्रमांक - अतुल पंडित हातेकर - रोख रक्कम ३,००१/-सर्टिफिकेट व सन्मान चिन्ह
तसेच या तबला वाद्य वादन स्पर्धेत एकूण ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख रक्कम १,०००/-व सहभागी सर्टिफिकेट देण्यात आले.