पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना "शांतीदूत"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."शांतीदूत" चे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजा माने हे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य आहेत.गेली ४२ वर्षे ते महाराष्ट्राच्या पत्रकारितेत सक्रीय आहेत.या प्रसंगी विद्याताई जाधव यांच्या हस्ते मंदा माने यांचा ही सन्मान करण्यात आला.
या वेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य सचिव महेश कुगावकर, राज्य संघटक अमोल पाटील,पुणे शहर पदाधिकारी पराग डिंगनकर , शांतीदूत परिवाराचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुरेश सपकाळ ,सचिव ,मधूकर चौधरी ,अध्यक्ष शिवाजी नगर शांतीदूत परिवार आदी उपस्थित होते.