पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) महाविद्यालयातील डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निकालात सर्व विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. डिप्लोमा फार्मसीच्या अंतिम वर्षाचा निकाल ९७.७२ टक्के तर प्रथम वर्षाचा निकाल ९३.७३ टक्के लागला आहे. अंतिम वर्षातील साक्षी प्रकाश वाघ ८३.६४ टक्के गुण घेवून प्रथम, तर प्रणाली वसंत कदम या ८२.८२ टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकावर आहेत तर अस्मिता महादेव पासले यांनी ८१.३६ टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला.
अंतिम वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांना ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असल्याने विशेष गुणवत्ता यादी (डिस्टिंक्शन) मध्ये तर २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच प्रथम वर्षातील रोहिणी विश्वनाथ लम्बे ७९.१० टक्के गुण घेवून प्रथम, तर विनोद हनुमंत बंडगर ७७.६० टक्के गुण घेवून द्वितीय आणि पायल दत्तात्रय गदडे ह्या ७६.०० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. प्रथम वर्षात ५ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये तर २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार हे विद्यार्थ्यांचा गौरव करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांची चिकाटी, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे बहुमोल सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. भविष्यातही असेच यश मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव प्रा. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, पालक यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिस्तबद्ध वातावरण यामुळे सातत्याने चांगले शैक्षणिक परिणाम साधले आहेत. यंदाचे घवघवीत यश हेच स्वेरीच्या प्रत्येक घटकाच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे, हेच खरे!