भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावचे पोलीस पाटील नितीन देठे पाटील यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गावामध्ये आगामी साजरे होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट यांनी मार्गदर्शन करताना गणेशोत्सव साजरा करताना शांततेत साजरा करावा असे आवाहन केले तसेच गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबवावेत असेही ग्रामस्थांना सुचित केले गणेशोत्सव साजरे करताना लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित कराव्यात तसेच गावामध्ये गणेशोत्सव साजरे करताना गणेश मंडळांनी वृक्षारोपण करावे असेही आव्हान केले.
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती रेखा घनवट या प्रथमच धोंडेवाडी गावात आल्यामुळे त्यांचा पोलीस पाटील नितीन देठे पाटील व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय वीरसेन पाटील पोलीस अधिकारी नंदा मोहिते तसेच गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपसरपंच गोरख जाधव संभाजी राजे देठे औदुंबर देठे मंगेश देठे पांडुरंग कोळी दामोदर देठे बाळू देठे तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्रदर्शनानंतर बैठकीचा समारोप करण्यात आला