बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
बार्शी तालुक्यातील शेळगाव हे गांव मराठवाडा हद्दी लगतचे सिमावर्तीय भागातील गांव आहे.या गावातून मराठवाड्यातील तुळजापूर,काटी, सावंतवाडी व वाणेवाडी आदी महत्त्वाच्या गावाला जाणारा रस्ता आहे.हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या विभागाला जोडला जाणारा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता शेळगाव या गावाच्या पूर्व दक्षिण कोपर्यातून पुढे मराठवाडयात जातो. शिवाय सोलापूर बार्शी या महामार्गाला देखील तो रस्ता मिळतो . त्यामुळे या रस्त्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आदींचे माध्यमातून मोठी दळणवळण सुरू असते.हा रस्ता गेली २५ ते ३० वर्षा पासून वहातुकीस योग्य नाही. रस्त्यावर पुल नसल्याने रस्ता अतिवृष्टीचे काळात पाण्याखाली जातो, रस्त्याचे कडेला काटेरी झाडा झुडपानी वेढा घातला आहे.
त्यामुळे रस्ता दिसत नाही, चिखल होत असलेने दुचाकी, चारचाकी वहाने, बैलगाडी आदी वहाने जात येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाणेवाडी लगतच्या मात्र शेळगाव हद्दीतील बसवेश्वर नगर भाग १व २ मधील रहिवासी , शेतकरी, शेतमजूर,दुध उत्पादक, शाळकरी मुले, व्यापारी यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.सध्या शेळगाव पाझर तलाव संततधार पावसामुळे तुडुंब भरला असून त्याचा सांडवा दुतर्फा वहात आहे.
यामुळे स्थानिक रहिवास्याचे प्रचंड हालहाल सुरू आहेत. कसलीही शेतीची कामे करता येत नाहीत त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. शाळकरी मुलांना या अडचणीच्या रस्त्यामुळे सक्तीने शाळेला सुट्टी घ्यावी लागत आहे.दिवसेंदिवस नागरीका मध्ये असंतोष व संताप वाढत आहे.
हा रस्ता दुरूस्त होऊन मिळावा म्हणून शेळगाव,वाणेवाडी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,तंटा मुक्त समिती अध्यक्ष,तसेच जिल्हा परिषदेचे मुख्यादयापक शिवाय स्थानिक शेतकरी दयानंद बादगुडे, बळीराम बादगुडे वगैरै लोकांनी प्रशासनाला अनेक लेखी निवेदने दिली आहेत. लोकशाही दिनात देखील मागणी केली होती.शिवाय मंत्रालयाच्या लोकशाही दीनात देखील निवेदन दिले आहे.
यासाठी धाराशिव चे खा.ओम राजे निंबाळकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा सूरू आहे.
परंतु प्रशासन मात्र सुस्त आहे. सिमावर्तीय भागातील रस्ता असलेने अधीकार कक्षेवरून प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे याचा उद्रेक स्थानिक रहिवासी, शेतकरी व विद्यार्थ्यानी वाढत आहे. आज ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लहान बालक विद्यार्थ्यानी हातात तिरंगा घेऊन सदर रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी शेतकऱ्यांनी देखील पुन्हा या अनोख्या आंदोलनातून रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे.