पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अंगारकी चतुर्थी दिवशी श्री क्षेत्र पखालपूर येथील गणपती दर्शनासाठी एसटी महामंडळाने दिवसभर बसेस सोडून भाविकांची सोय केल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
संकष्टी चतुर्थीनिमित्त मागील अनेक वर्षांपासून पखालपूरसाठी सुरू असलेली बस सेवा बंद झाली होती. त्यामुळे भाविकांची अडचण होत होती खाजगी वाहने रिक्षाने जाणे सामन्य प्रवाशांना परवडणारे नव्हते हे लक्षात घेऊन ग्राहक पंचायतीने ही बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी पंढरपूर आगार प्रमुखाकडे केली होती.याबाबत आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अंगारकी चतुर्थी निमित्ताने ही सेवा उपलब्ध करून दिली. त्यास भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिला.बसच्या ५० फेऱ्या झाल्या. ही सेवा सुरू केल्याबद्दल स्थानक प्रमुख अंकुश सरगर व त्यांच्या सहकाऱ्यांना ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,उपाध्यक्ष विनय उपाध्ये, तालुका सदस्य सागर शिंदे,विभाकर पंचवाडकर यांनी धन्यवाद दिले. याबाबत "तेज न्यूज" ने आवाज उठविला होता.
यापुढे प्रत्येक संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा उपलब्ध होणार आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक यंत्रशाळा अधिक्षक तावरे, सुभाष कांबळे,सोमनाथ अष्टेकर, समाधान मेटकरी,सुमित भिंगे यांनी केले आहे.