पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पु.अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्चतंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीमध्ये ‘हर घर तिरंगा अभियाना' चे आज उदघाटन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा अभियान’ संपुर्ण देशामध्ये दि. ०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. सूचनेनुसार स्वेरीमध्ये स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार ‘हर घर तिरंगा अभियान’ चे महत्व पटवून सांगितले. संस्थेचे नूतन सचिव प्रा. सुरज रोंगे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन केले जात असून अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करुन विशेष काळजी घेण्यात येत आहे.
हर घर तिरंगा अभियान प्रसंगी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ.के.बी.पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर.गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एन.यु. कौटकर, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.आय. सी. मैतीय, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.आर.बामणे, इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ.एस.एस. वांगीकर, एम.बी.ए. विभागाच्या प्रमुख डॉ. एम.एम.भोरे, तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे यांच्यासह इतर विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.