पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे अँटी रॅगिंग सेल व अंतर्गत निवारण समिती (Internal Complaints Committee) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित वक्ते ॲड. चैतन्य ताठे, डॉ.स्मिता गव्हाणे, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा.अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्याते आले.
या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जागरूकता निर्माण करणे, तसेच शैक्षणिक जीवनातील मानसिक ताणतणाव कसा हाताळावा याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हा होता.
यानंतर अँटी रॅगिंग सेलचे चेअरमन प्रा. अंजली पिसे यांनी युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रॅगिंगविरोधातील कायदे, महाविद्यालयाने घेतलेली प्रतिबंधात्मक पावले आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मदतीच्या पर्यायांवर सविस्तर माहिती दिली.
पहिल्या सत्रात "रॅगिंग- शैक्षणिक जीवनातील दुर्लक्षित कॅन्सर" या विषयावर ॲडव्होकेट चैतन्य ताठे यांनी मार्गदर्शन केले. यात रॅगिंगचे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक दुष्परिणाम, रॅगिंगविरोधी कायदे व तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
दुसऱ्या सत्रात "शैक्षणिक जीवनातील ताणतणावाला सामोरे जाताना" या विषयावर डॉ. स्मिता गव्हाणे यांनी तणाव व्यवस्थापन, आत्मभान, संवाद कौशल्य आणि वेळेच्या व्यवस्थापनासंदर्भात विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमात डॉ. स्मिता गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तणावाचे मूळ कारण, त्याचे परिणाम व त्यावर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी श्वासोच्छ्वासाच्या तंत्रांचा वापर, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक विचार, योग्य झोप, आहार, आणि संवाद कौशल्य यासारख्या अनेक उपयुक्त बाबींचे महत्त्व सांगितले.
विद्यार्थ्यांनीही आपल्या शंका व अनुभव मांडून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या तणावाच्या अनुभवांची उघडपणे मांडणी केली आणि त्यावर मिळालेल्या सल्ल्याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. सदरील कार्यक्रमास २५० हून अधिक विदयार्थी उपस्थित होते.
ॲड. चैतन्य ताठे यांनी विदयार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नोत्तरातून महाविदयालयामध्ये एकही अँटी रॅगीगची तक्रार नसल्याचे ऐकून महाविदयालयाचे तसेच प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांच्या शिस्तबध्द व्यवस्थापनाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु. स्वप्नजा काळे व सृष्टी अरकीले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी अँटी रॅगिंग सेल व तक्रार निवारण समितीचे चेअरमन व सदस्य प्रा.अंजली पिसे, अंजली चांदणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.