पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर-पुणे-वल्लभनगर या मार्गावर नविन लालपरी व ई बससेवा सुरू करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने एसटी चे विभाग नियंत्रक व आगार प्रमुख यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर आगाराकडे नविन लालपरी दहा, तसेच ईलेक्ट्रिक सहा बस धावताना दिसत आहेत. तथापि पंढरपूर-पुणे या गर्दीच्या मार्गावर एकही नविन लालपरी अथवा ईलेक्ट्रिक बस सुरू केलेली नाही.अद्यापही या मार्गावर जुन्याच बस धावत आहेत. या मार्गावर पंढरपूरहून निगडीपर्यंत जाणाऱ्या पहाटे व सायंकाळी सुमारे पंधरा ट्रॅव्हल्स चालू आहेत. मात्र एसटी महामंडळाने दिवसभरात महामंडळाकडे ईलेक्ट्रिक बस येऊनही या मार्गावर बस दिलेली नाही.
पुणे-वल्लभनगरपर्यंत जाणारी भरपूर प्रवासी संख्या आहे. मात्र त्यांना जुन्या बसमधून फक्त स्वारगेटपर्यंत जाता येते व पुढे जाण्यासाठी इतर वाहनाचा वापर करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.
तरी येथील भाविक,प्रवाशांना चांगली सेवा मिळण्यासाठी पंढरपूर टेंभुर्णी इंदापूर मार्गे पुणे -वल्लभनगरपर्यंत ईलेक्ट्रिक बस व लालपरी तसेच पंढरपूर फलटण पुणे मार्गावर लालपरी बससेवा सुरू करतील अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, सदस्य विनोद भरते,जिल्हा सचिव सुहास निकते, पालक सुभाष सरदेशमुख,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,सदस्य अण्णा ऐतवाडकर,तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सदस्य सागर शिंदे, यांनी व्यक्त केली आहे.