पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
घोडेगाव येथील फ्लॅटवर संत नामदेव महाराज यांचे वंशज ह भ प निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर) यांचे चरण लागले.एक रात्र त्यांनी आमच्या फ्लॅटवर मुक्काम केला.आज घोडेगाव ग्राम दैवत राजा हरिश्चंद्र यांची गावची यात्रा असून त्या निमित्ताने नामदास महाराजांचे कीर्तन प्रवचन आहे.खूप छान वाटले की महाराज स्वतःहून आमच्या घरी आले.काही गोष्टी असतात की त्या आपोआप जुळून येतात.महाराजांबद्दल ऐकून होतो.आज प्रत्यक्ष भेट झाली.तसेच अनेक विषयांवर चर्चा झाली.महाराज काल मालेगावहून कीर्तन संपवून रात्रभर प्रवास करून पहाटे चार वाजता आमच्या घोडेगाव निवासस्थानी पोहचले.आज सकाळी ९ ते ११ घोडेगाव येथे कीर्तन करून पुन्हा पंढरपूर ला रवाना होणार आहेत.
भागवत धर्माची पताका संत नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत पोहचवली.त्यांचा वारसा निवृत्ती महाराज चालवित असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे कार्य सुरू आहे.२० ऑगस्ट ला कांदिवली क्रांती नगर येथे माझा कीर्तनाचा कार्यक्रम आहे.हिरवे सर वेळ मिळाला की या नक्की असे सांगायला देखील ते विसरले नाहीत.घोडेगाव शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष संजय नांगरे, उपाध्यक्ष गणेश नांगरे, दीप नांगरे, महाराजांचे सारथी कोरे आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
महाराजांच्या पायाची धूळ आमच्या वास्तूला लागली.खूप खूप धान्य होऊन पावलो.महाराज आपण आलात आपले मनापासून आभार ! असंच प्रेम आशीर्वाद आमच्यावर राहू द्या.
संत न होते जगत में...जल मरता संसार हे जे बोलले आहे ते खरच आहे.आजही संतांचे नाव आणि कार्य याचा सर्वत्र जयजयकार होतो आहे.संत आहेत म्हणून हे विश्व टिकून आहे हे नक्की !
आमचे मित्र नातेवाईक धनंजय नांगरे आणि सिद्धेश हिरवे यांच्या प्रयत्नाने महाराजांचे आमच्या वास्तूत आगमन झाल्याबद्दल नांगरे परिवार आणि हिरवे परिवार यांचे पण धन्यवाद मानले.