पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
'शै.वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या झालेल्या तिन्ही फेरीचा विचार केला असता नेहमीप्रमाणे या ही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थांची संख्या, शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण, मिळालेली मानांकने, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसत आहे. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे निर्णय, अयोग्य ब्रँचची निवड व सीईटीचा स्कोअर, गुंतागुंतीचे नियम यामुळे स्वेरी महाविद्यालय मिळाले नाही असे असताना विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते शनिवार दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या चौथ्या अर्थात अखेरच्या कॅप राउंड द्वारे ही संधी उपलब्ध झाली आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील यांनी केले.
प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील हे आपले विचार व्यक्त करत होते. 'शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाच्या चौथ्या फेरीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते शनिवार, दि.३० ऑगस्ट २०२५ असे एकूण तीन दिवस चालणार आहे. ज्यांना पहिल्या फेरीत, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी तिसऱ्या फेरीत नॉट फ्रीझ/ बेटरमेन्ट केले आहे त्यांना या अखेरच्या फेरीचा लाभ घेता येणार आहे. चौथ्या कॅप फेरीत जो पर्याय मिळेल तो ‘ऑटोफ्रीज’ असणार आहे त्यामुळे मिळालेली ब्रँच अथवा महाविद्यालय हे घ्यावेच लागणार आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. सन २०२५-२६ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच तीन प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसरी फेरी झाल्यावर देखील विद्यार्थ्यांना योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही अखेरची चौथी फेरी असणार आहे.
मागे झालेल्या चूका टाळून व कट ऑफचा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-४ चे ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक आहे. ‘योग्य महाविद्यालय निवडताना त्या महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, कॅम्पस मधून मिळणारे संस्कार, शैक्षणिक वातावरण, सोयी-सुविधा या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. चौथ्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) अधिकृत संकेतस्थळावर सोमवार, दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. चौथ्या प्रवेश फेरीच्या जागावाटप (अलॉटमेंट) नंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन मंगळवार, दि. ०२ सप्टेंबर ते गुरुवार, दि.०४ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ०५:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागेल.
स्वेरी अभियांत्रिकीच्या स्क्रुटनी सेंटर (एस.सी.क्रमांक-६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सोय केली असून प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वेरी महाविद्यालय सज्ज झाले आहे.