पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गुरुवार, दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ साजरा करण्यात आला.
विश्वविद्यालय अनुदान आयोग शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या सूचनेनुसार देशाच्या फाळणीच्या वेदनादायक आठवणींना उजाळा देवून फाळणीमधून मिळालेले धडे हे युवा पिढी पर्यंत पोहचविण्याच्या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्वेरीमध्ये ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ साजरा करण्यात आला.
स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. उदघाटन प्रसंगी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. डॉ. खेडकर यांनी व्याख्यानातून १९४७ मधील फाळणीतील भीषण घटना, त्यातून निर्माण झालेले मानवी दुःख व बलिदान यांची आठवण करून दिली. तसेच आजच्या पिढीने एकात्मता, शांती व बंधुता जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, डॉ. एन.पी. कुलकर्णी, प्रा. एस. आर.गवळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी.चौंडे, इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, एनएसएस स्वयंसेवक तसेच जवळपास १२० विद्यार्थी उपस्थित होते.