मुंबई प्रतिनिधी पूनम पाटगावे
जोगेश्वरी पूर्व वांद्रेकर वाडी येथील हम रस्त्यावरील चेंबर वरील लोखंडी जाळी अनेक दिवसांपासून तुटली होती.स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी याठिकाणी कोणीही पडून अपघात होऊ शकतो हा धोका ओळखून मुंबई महानगर पालिकेकडे ऑनलाईन तक्रार दिनांक ३१ जुलै २०२५ दाखल केल्या नंतर त्याच दिवशी पालिकेच्या संबंधित खात्याकडून येथे नवीन जाळी बसविण्यात आली.
पालिकेचे दाखविलेल्या आग्रही भूमिकेमुळे येथील संभाव्य अपघात धोका टळला आहे म्हणून हिरवे यांनी पालिकेला धन्यवाद दिले आहेते.तसेच पालिकेकडे येणाऱ्या कोणत्याही तक्रारींचे जलद गतीने निरसन होण्याची मागणी देखील हिरवे यांनी केली आहे.स्थानिक रहिवाशांनी हिरवे यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी त्यांचे आभार व्यक्त केलेत.