पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब आणि आरती स्पीकर मनमाडकर परिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या रविवार दिनांक ३ ऑगस्ट सायंकाळी ६:०० वाजता आरती प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे या सायंकलीन मैफिलीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गोड गळ्याची गायिका गायत्री गायकवाड-गुल्हाणे यांची अभंग ठुमरी आणि गझल या विविध गायन प्रकार असलेली सायंकालीन संगीत मैफिल आयोजित करण्यात आली.
या मैफिलीसाठी महाराष्ट्राष्टातील ख्यातनाम तबलावादक पांडुरंग पवार, व्हायोलिन केदार गुळवणी सिंथेसाईजर अविनाश इनामदार आणि पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे असणार आहे तर ध्वनी संयोजन धनंजय भैय्या मनमाडकर यांचे असणार आहे.अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने खास रसिक श्रोत्यांच्या आग्रहाखातर ही आगळीवेगळी मैफिल आयोजित करण्यात आली.
पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती भगवान भाऊ मनमाडकर ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे.संपर्क 9767776858 साधावा