अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातूनच महामानवांचे विचार आचार जनमाणसात युवा पिढीच रुजवणार : सिद्धार्थ खरात
म्हसवड (सातारा ) प्रतिनिधी सचिन सरतापे
सातारा येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी 48 तास अभ्यास करण्याचा उपक्रम स्वतःहून अंगीकारला आहे. यामध्ये त्यांच्या पालकांनी तसेच अनुभव शिक्षा केंद्र यांचे जिल्हा समन्वयक आयु. सिद्धार्थ खरात यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अनुभव शिकशा केंद्र संपूर्ण महाराष्ट्र राज्या मध्ये विविध जाती आणि धर्माच्या शाळा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, युवक, तरुण-तरुणी, विविध उद्योजक तसेच सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या तरुणांच्या सोबत काम करत आहे. अनुभव युवा महाराष्ट्रात सामाजिक न्याय, समता, समानता, सदभाव, शांती, अहिंसा, पर्यावरण प्रेम, एकता, सदाचार, या मूल्यांना घेऊन विविध विषयाद्वारे युवकांना जोडून ठेवण्याचे काम करत आहे. महामानवांचे विचार आचार यांना जनमानसात रुजविण्यासाठी अनुभव युवा सातारा जिल्ह्यात सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड, कोरेगांव या तालुक्यातील विविध कॉलेज, शाळा, ITI, शहर, वस्त्या आणि गाव पातळीवर अनुभव कट्टा स्थापन करून मूल्य दृष्टीत युवक बनविण्याचे काम सुरू केले असल्याचे सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
त्याचाच एक भाग म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र येऊन 48 तास अभ्यास करण्याचा उपक्रम पार पाडत आहेत. मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी, तसेच विविध प्रकारचे शोषण विरहित समाजाच्या दृष्टीने शिक्षण हे महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळेच विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांनी शिक्षणामार्फतच बदल घडवण्याचे ठरवलेले आहे.
यां उपक्रमामध्ये भवानी नाईट हायस्कूल येथून शिक्षण घेऊन इयत्ता दहावी पास झालेले असंघटित क्षेत्रातील काम करणारे, बंटी डांगे, सागर खरात, सागर गाडे, महेश वायदंडे, दुर्वास पाटसुते यांचे मार्गदर्शन लाभले. त्या सोबत सातारा नगर परिषद शाळेचे शिक्षक जितेंद्र गोखले, श्री जयंत निकम सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आहे.