सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर राजस्थान येथे दिनांक 16 /7/ 2025 पासून 31/7/ 2025 पर्यंतचे शिल्प ग्राम दर्शनला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या, कलावंतांना राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली, याप्रसंगी महाराष्ट्राची लोककला शाहिरी पोवाडा ,लावणी, गोंधळ, वाघ्या मुरळी, भारुड, उदयपूर शिल्पग्रामला महाराष्ट्राची लोककला प्रदर्शित करणारे, महाराष्ट्राचे जेष्ठ कलावंत शाहीर सुभाष गोरे, जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर, कलावंतांचा सत्कार सन्मानपत्र देऊन राज्यपाल यांनी केला.
याप्रसंगी उदयपूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, महानगर परिषदेचे मुख्य अधिकारी, नेते मंडळी, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे डायरेक्टर, आदि मान्यवर उपस्थित होती, या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले, आपल्या भारत देशाची संस्कृती लोककलाकार जपत आहेत, प्रत्येक राज्यातील लोककलाकारांचा जथ्था, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर शिल्प ग्रामदर्शन येथे परदेशी पर्यटकांचे केंद्रबिंदू ठरलेली, आपली लोककला सादर करून लोककला जतन व संवर्धन करीत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे, सांस्कृतिक लोककला जतन करणाऱ्या कलावंतांच्या पाठीशी सदैव राहिलो आहे व राहणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे शाहीर सुभाष गोरे, यांचा व इथून पुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलावंतांचा मानसन्मान कायम राहील, अशी ग्वाही दिली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजकांनी केले, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर संचालक यांनी आभार मानले.