पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थी पाराप्पा तुकाराम गुटूकडे या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पाराप्पा गुटूकडे हे मूळचे हुलजंती गावाचे असून त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण शेळवे येथील कर्मयोगी इंस्टिट्यूटमधील सिव्हिल इंजिनियरिंग विभागामध्ये पूर्ण झाले. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल महाविद्यालयामध्ये त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना पाराप्पा गुटूकडे म्हणाले की अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याआधी सरकारी नोकरी मध्ये जायचे असे काही ठरविले नव्हते परंतु कर्मयोगी इंस्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना येथील शिक्षकांनी खासगी नोकरी बरोबर च सरकारी आस्थापनामद्धे असणार्या संधीची वेळोवेळी माहिती करून दिली आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी आस्थापणामद्धे अधिकारी होण्याची जिद्द मनामद्धे निर्माण झाली. कठोर परिश्रम आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे नेटके मार्गदर्शन यांमुळेच यश मिळू शकले असे त्यांनी आवर्जून संगितले.
पाराप्पा गुटूकडे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की पाराप्पा यांना मिळालेल्या यशामागे त्यांची जिद्द, मेहनत व सातत्य हेच आहे. त्यांना मिळालेले यश हे कर्मयोगी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कर्मयोगी इंस्टिट्यूटमधे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेमद्धे यश मिळण्यासाठी विशेष तयारी करून घेतली जाते. सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारी गेट च्या परीक्षेची तयारी करून घेतली जाते तसेच विद्यार्थ्यांसाठी “करियर कट्टा” हे विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमद्धे यश मिळण्याचे प्रमाण वाढत आहे असे त्यांनी आवर्जून संगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. मोहसिन शेख, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा.दिपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक यांनी पाराप्पा गुटूकडे यांच्या निवडीसाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.