पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागातील, वरवंड ता.दौंड येथील साक्षी तुकाराम काटकर, वाकी शिवणे, ता.सांगोला येथील प्रतिक्षा नवनाथ दणके, सिध्देवाडी, ता.पंढरपूर येथील अंजना रामचंद्र गोडसे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील, मंगळवेढा येथील संस्कृती हेमंतकुमार किरकिरे यांची टेक महिंद्रा, पुणे कंपनीत निवड झाली असून दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी कंपनीमध्ये रुजू झाल्या असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
टेक महिंद्रा ही कंपनी ही बहूराष्ट्रीय कंपनी आहे. टेक महिंद्रा ही कंपनी माहिती, तंत्रज्ञान, सेवा व सल्लागार कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून ९० देशामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. भारतातील आय.टी. कंपन्यामध्ये फॉरचून इंडिया ५०० यादीमध्ये या कंपनीने स्थान पटकाविले आहे. देशातील व परदेशातील नामांकित कंपन्याना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनियर हे पंढरपूर सिहंगड इंजिनियरींग महाविदयालयामध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य यांचा समन्वय साधून महाविदयालयाकडून उत्कृष्ठ पध्दतीचे शिक्षण आणि प्लेसमेंटची तयारी करुन घेतली जाते. यामुळे पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विदयार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत. सोलापूर जिल्हयामध्ये जापनीज भाषा शिकवणारे पंढरपूर सिंहगड हे एकमेव अभियांत्रिकी महाविदयालय असून मोठया प्रमाणात आय.टी कंपन्या दरवर्षी महाविदयालयास कॅम्पस प्लेसमेंटसाठी भेट देत असतात.
वरील विदयार्थ्यांचे कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे, प्रा.वैभव गोडसे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.